बंद
    • जिल्हा न्यायालय, अमरावती संकुल

      जिल्हा न्यायालय, अमरावती संकुल

    ताज्या बातम्या

    जिल्हा न्यायालयाबद्दल

    अमरावती न्यायालयाचा इतिहास
    कोर्ट व वकीली व्यवसायाचा उदय इ.स. १८५३ मध्ये व-हाड प्रांतात सुरु झाला आणि इंग्रजांच्या न्यायालयीन कामकाजांचे पध्दतीमुळे वकीली व्यववसाची सुरुवात झाली. कोर्टाच्या इमारती जरी सन १८६० ते १९०० या दरम्यान बांधण्यात आल्या तरी कोर्टाचे कामकाज मात्र १८५३-५४ मध्येच व-हाडात सुरु झाले होते. सदरहु कोर्ट सुरुवातीला एखादया सार्वजनिक शाळेच्या इमारतीत किंवा इतर खाजगी इमारतीत भरवीली जात असत. सन १८८६ मध्ये स्मॉल् कॉज कोर्ट एस.डी.ओ.च्या इमारतीमध्ये होते.
    अमरावतीला ज्युडीशियल कमिशनरचे कोर्ट होते व शेवटचे अपीलेट कोर्ट हैद्राबाबद येथे रेसीउंटचे होते. अमरावतीला वरीष्ठ कोर्ट असल्यामूळे व-हाडातील बहुतेक सर्व कामे अमरावतीलाच येत असत. इ.स. १९०६ साली व-हाड हा प्रांत राज्य कारभाराकरीता मध्यप्रांतात जोडण्यात आला.अमरावतीचे ज्युडिशियल कमिशनरचे कोर्ट बंद होवुन नागपुरच्या ज्युडिशियल कमिशनरच्या कोर्टाचा अंमल व-हाडावर सुरु झाला.अमरावतीच्या दिवाणी न्यायालयाचे रेकॉर्डरुममध्ये आजही सन १८५४ पासुनच्या दिवाणी स्वरुपाच्या केसेेस पाहावायास मिळतात. कोर्टाचे कामकाज मुख्यतः मोडीतुन चालत असे.सरकारी वकीलाची नियुक्ती ही प्रथमच सन १८९३ पासुन चालु झाल्याचे दिसुन येते. व-हाडप्रांत मध्यप्रांतास १९०५ मध्ये जोडल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येवु लागली.
    अमरावतीत इ.स. १८७० मध्ये व १८८४ चे सुमारास सुमारे ४० वकील कोर्टात काम करीत होते. इ.स. १८७८ मध्ये अमरावतीत वकीलांची संख्या ९२ होती. स.न. १८८२ च्या पुर्वीपासुन भाजीबाजारात स्पेशल बेंच मॅजिस्टेट कोर्ट होते. सेशन कोर्टाची इमारत १८८९ पासुन बांधकाम सुरु झाले[...]

    अधिक वाचा
    मुख्य न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुंबई
    मुख्य न्यायमूर्ती सन्माननीय श्री देवेंद्र कुमार उपाध्याय मुख्य न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुबंई
    प्रशासकीय न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठ
    प्रशासकीय न्यायाधीश सन्माननीय श्रीमती वृषाली व्ही जोशी अमरावती पालक न्यायमूर्ती
    प्रतिमा नाही
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती सन्माननीय श्री सुधाकर व्ही. यरलागड्डा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा