इतिहास
अमरावती न्यायालयाचा इतिहास
कोर्ट व वकीली व्यवसायाचा उदय इ.स. १८५३ मध्ये व-हाड प्रांतात सुरु झाला आणि इंग्रजांच्या न्यायालयीन कामकाजांचे पध्दतीमुळे वकीली व्यववसाची सुरुवात झाली. कोर्टाच्या इमारती जरी सन १८६० ते १९०० या दरम्यान बांधण्यात आल्या तरी कोर्टाचे कामकाज मात्र १८५३-५४ मध्येच व-हाडात सुरु झाले होते. सदरहु कोर्ट सुरुवातीला एखादया सार्वजनिक शाळेच्या इमारतीत किंवा इतर खाजगी इमारतीत भरवीली जात असत. सन १८८६ मध्ये स्मॉल् कॉज कोर्ट एस.डी.ओ.च्या इमारतीमध्ये होते.
अमरावतीला ज्युडीशियल कमिशनरचे कोर्ट होते व शेवटचे अपीलेट कोर्ट हैद्राबाबद येथे रेसीउंटचे होते. अमरावतीला वरीष्ठ कोर्ट असल्यामूळे व-हाडातील बहुतेक सर्व कामे अमरावतीलाच येत असत. इ.स. १९०६ साली व-हाड हा प्रांत राज्य कारभाराकरीता मध्यप्रांतात जोडण्यात आला.अमरावतीचे ज्युडिशियल कमिशनरचे कोर्ट बंद होवुन नागपुरच्या ज्युडिशियल कमिशनरच्या कोर्टाचा अंमल व-हाडावर सुरु झाला.अमरावतीच्या दिवाणी न्यायालयाचे रेकॉर्डरुममध्ये आजही सन १८५४ पासुनच्या दिवाणी स्वरुपाच्या केसेेस पाहावायास मिळतात. कोर्टाचे कामकाज मुख्यतः मोडीतुन चालत असे.सरकारी वकीलाची नियुक्ती ही प्रथमच सन १८९३ पासुन चालु झाल्याचे दिसुन येते. व-हाडप्रांत मध्यप्रांतास १९०५ मध्ये जोडल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येवु लागली.
अमरावतीत इ.स. १८७० मध्ये व १८८४ चे सुमारास सुमारे ४० वकील कोर्टात काम करीत होते. इ.स. १८७८ मध्ये अमरावतीत वकीलांची संख्या ९२ होती. स.न. १८८२ च्या पुर्वीपासुन भाजीबाजारात स्पेशल बेंच मॅजिस्टेट कोर्ट होते. सेशन कोर्टाची इमारत १८८९ पासुन बांधकाम सुरु झाले व १८९४ मध्ये ती वास्तु तयार होवुन कामजास सुरुवात झाली.
श्री मुधोळकर, श्री प्रल्हादपंत जो, श्री आळशी, श्री दादासाहेब खापर्डे हे सन १८८५ ते १८९० पर्यंत मुनसीपल व असि.कममिशनर होते. श्री भाउसाहेब असनारे हे अगोदरच्या काळातील नामांकित वकील तसेच अलीकडच्या काळात श्री पागांरकर, श्री राजाभाउ गोखले श्री अकर्ते हे नामांकित वकील हाेवुन गेलेत.
AMRAVATI DISTRICT